"लोक - शास्त्र सावित्री" हे जगातील एकमेव अद्वितीय रंगमंचावरील नाटक आहे !  - प्रिया नप्ते आतंरराष्ट्रीय बाल प्रबोधनकार.

 "लोक - शास्त्र सावित्री" हे जगातील एकमेव अद्वितीय रंगमंचावरील नाटक आहे ! 

  • प्रिया नप्ते ( आतंरराष्ट्रीय बाल प्रबोधनकार.)

    "लोक - शास्त्र सावित्री" हे जगातील एकमेव अद्वितीय रंगमंचावरील नाटक आहे !   - प्रिया नप्ते आतंरराष्ट्रीय बाल प्रबोधनकार.

रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित - दिग्दर्शित, थिएटर ऑफ रेलेवन्स प्रस्तुत लोक - शास्त्र सावित्री' नाटक माणसाच्या अस्तित्वाच व महापुरुषांच्या विचार धारेवर  आधारित असून, विदेशी मनुवादी व्यवस्थेने निर्माण केलेल्या पितृसत्ताक व्यवस्थेच्या गुलामगिरीच्या बेड्या तोडणार, माणसाला प्रत्येक क्षणाला प्रश्न विचारत, त्या प्रश्नांच समाधानकालक परिणाम देणार हे जगातील एकमेव अद्वितीय रंगमंचावरील नाटक म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही, याची मला पूर्ण खात्री आहे. कारण ते मेंदूत बुध्दी असलेल्या प्रत्येक माणसास जागृत करणार,  वैचारिक व बोधात्मक आहे. 

          देश- विदेशातील प्रत्येक सुजाण नागरिककाने 'लोक - शास्त्र सावित्री' हे नाटक सहकुटुंब मित्रपरिवारसह एकवेळ आवश्य पहावे. मला पूर्ण खात्री आहे की मानवतेच्या विचारांचा अंगार पेटल्या शिवाय ते रहाणार नाही.💐🙏


Comments