डोळ्यातून ओघळणारे अश्रू अगदी पाचव्या रांगेतील प्रेक्षकालाही स्पष्टपणे जाणवत राहतात - संतोष नागो शिंदे
नाटक उत्तमच जमून आलं आहे. मानवी उत्क्रांती ते आज पर्यंतचा प्रवास छान उलगडून दाखवला आहे. सर्व कलाकारांनी जीव ओतून काम केल्याचं सतत जाणवत राहतं. विशेष करून कोमल खामकर हिची शेतकरीची व्यथा मांडतांना डोळ्यातून ओघळणारे अश्रू अगदी पाचव्या रांगेतील प्रेक्षकालाहीस्पष्टपणे जाणवत राहतात. हे जीव ओतून काम करणं केवळ नाटक म्हणून नव्हे तर पर्यावरण संवर्धनासाठीची तळमळही दर्शवते. प्राप्त परिस्थितीत जन्म घेणाऱ्या मला खूप अपराधी वाटतं आणि प्रश्न पडतात, पण त्याचवेळी मला एक जागरूक माणूस म्हणून काय करता येईल ह्याचे भान हे नाटक देते…
Let’s work together to get into ‘The... Other World…!’
- संतोष नागो शिंदे

Comments
Post a Comment